तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “त्या लोकापैकी ज्यांना मुलगा होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्या पण मुलगी मात्र जिवंत ठेवा
Cross references
दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले;ते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
तो म्हणला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
राजकन्येने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले, ते बाळ रडत होते, म्हणून तिला त्याच्याबद्दल फार वाईट वाटले! ती म्हणाली, “हा बाळ कोणातरी इब्री म्हणजे इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे.”
परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही.
राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.
त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.
तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्यावझरे रक्तमय झाले.