Home Bibles एस्तेर 9:5 · मराठी बायबल
एस्तेर 9:5 · मराठी बायबल

यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा त्यांनी मन:पूत समाचार घेतला.

Cross references

नहेम्या 9:24

या वंशजांनी तो प्रदेश घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला. तूच त्यांच्या हातून हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांच्याशी तू त्यांना मन मानेल तसे वागू दिलेस

एस्तेर 8:11

त्या पत्रांमधील राजाचे आदेश असे होते:प्रत्येक नगरातील यहुद्यांना स्वसंरक्षणासाठी एकत्र जमण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रांतातील कोणतेही सैन्य त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकामुलांवर चालून आले तर त्या सैन्याला ठार करण्याचा, त्याला पुरते नेस्तनाबूत करण्याचा हक्क त्यांना आहे. आपल्या शत्रूची मालमत्ता ताब्यात घ्यायचा, तिची नासधूस करायचा यहुद्यांना अधिकार आहे.

स्तोत्रसंहिता 18:34

देव मला युध्दाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.

स्तोत्रसंहिता 18:47

देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.

स्तोत्रसंहिता 20:7

काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.

स्तोत्रसंहिता 92:12

परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.

स्तोत्रसंहिता 149:6

लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.

यिर्मया 18:21

म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.

2 थेस्सलनीकाकरांस 1:6

खरोखर जे तुम्हांला दु:ख देतात त्याची दु:खाने परतफेड करणे हे देवाच्या दृष्टीने त्याच्यासाठी योग्य आहे.

Interlinear

Choose Theme