राजाच्या आज्ञापत्राची प्रत पाठवायची होती. हे आज्ञापत्र म्हणजे कायदाच होता. प्रत्येक प्रांतात तो कायदा लागू होता. राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये तो जाहीर केला गेला. यहूद्यांनी या विशिष्ट दिवशी तयार राहावे, त्यांना शत्रूला शह देता यावा म्हणून हा आदेश पाठवला गेला.
Cross references
तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.”
हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून द्यायची होती. प्रत्येक प्रांतात हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांना तो कळवण्यात येणार होता, जेणेकरून त्या दिवशी ते लोक तयार राहिले असते.
दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल. तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.”
पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय?
ते मोठ्या आवाजात म्हणाले, “पवित्र आणि सत्य प्रभु, कोठपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणिआम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?”