त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले गेले. त्यांनी हामानच्या आज्ञा प्रत्येक प्रांताच्या भाषेत लिहून काढल्या. प्रत्येक लोकसमूहाच्या भाषेत त्यांनी त्या लिहिल्या. राजाचे कारभारी, वेगवेगळया प्रांतांचे अधिकारी, आणि वेगवेगळया लोकसमूहांचे नेते यांनाही त्यांनी लिहिले. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि राजमुद्रा उठवून ते आदेश त्यांनी मुद्रांकित केले.
Cross references
ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबची सही केली. अहाबचा शिक्का वापरुन पत्रांवर तो शिकृा उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
मग या लोकांनी राजा अर्तहशश्तने दिलेले पत्र राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि मंदिराला सहाय्य केले.
राजा अहश्वेरोशने सर्व राज्यभर खलिते पाठवले. प्रत्येक प्रांतात पाठवायचा खलिता त्या प्रांताच्या भाषेत होता. प्रत्येक राष्टाला तिथल्या भाषेत पत्र गेले. प्रत्येक पुरुषाची आपल्या घरात सत्ता चालावी असे त्या पत्रांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते.
राजाला आपली मुद्रा हामानकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयला दिली. मग एस्तेरने मर्दखयला हामानच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.
आता राजाच्या अधिकारात दुसरा आदेश लिहा. तुम्हाला सर्वात उत्तम वाटेल अशा पध्दतीने यहुद्यांना साहाय्यकारी होईल असा तो असू द्या. मग राजाच्या विशेष मुद्रेने त्या हुकामावर शिक्का उठवा. राजाच्या अधिकारात लिहिलेले आणि राजमुद्रेने मुद्रित केलेले राज्यकारभार विषयक पत्र कोणालाही रद्द करता येत नाही.”
मर्दखयने राजा अहश्वेरोशच्या नावाने आदेश काढले. मग ते राजाच्या मुद्रेने मुद्रांकित केले. आणि जासूदांकरवी घोड्यावरुन पाठवले. खास राजासाठी जोपासलेल्या वेगवान घोड्यांवरुन हे जासूद गेले.
तेव्हा राजा आताच्या आता हुकूम लिहून त्याच्यावर शिक्कामोर्तब कर. म्हणजे तो कोणीही बदलू शकणार नाही का? कारण मेदी का पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत किवा बदलूही शकत नाहीत.”
मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले दारयावेश राजा पुढील 30 दिवसात,तुझ्याशिवाय, देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकण्यात येईल, असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस हे खरे की नाही?राजा म्हणाला “हो! मी त्यावर सही केली आणि मेदी व पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत वा त्यात बदल होऊ शकत नाही.”
मग ते लोक एकत्र जमून राजाकडे गेले व त्याला म्हणाले,” हे राजा मेदी व पारसी यांनी शिक्कामोर्तब केलेला कायदा किंवा हुकूम कधीही रद्द होत नाही किंवा बदलू शकत नाही हे लक्षात ठेव.”