Home Bibles एस्तेर 2:23 · मराठी बायबल
एस्तेर 2:23 · मराठी बायबल

मग या बातमीचा तपास करण्यात आला. मर्दखयची खबर खरी असल्याचे आढळून आले. ज्या पहारेकऱ्यांनी राजाच्या खुनाचा कट केला होता त्यांना फाशी देण्यात आली. या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.

Cross references

उत्पत्ति 40:19

तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.”

उत्पत्ति 40:22

परंतु फारोने आचाऱ्याला फाशी दिले.; तेव्हा जे होईल असे योसेफाने सांगितले होते ते थेट तसेच घडून आले.

अनुवाद 21:22

“एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील.

यहोशवा 8:29

आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.

एज्रा 4:15

राजा अर्तहशश्त, तुमच्या आधी जे राजे होऊन गेले त्यांच्या कामकाजाचे वृत्तांत तुम्ही पहावा असे आम्ही सुचवू इच्छितो. त्या बखरीवरुन तुमच्या लक्षात येईल की यरुशलेमने इतर राजाविरुध्द उठाव करुन त्यांना नेहमीच जेरीला आणले आहे पूर्वापार हे चालत आलेले आहे, म्हणून यरुशलेम धुळीला मिळाले.

एस्तेर 5:14

मग हामानची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र यांनी एक सूचना मांडली ते म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारायला सांग तो75फूट उंच असू दे. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.”हामानला ती सूचना आवडली म्हणून त्याने फाशीचा स्तंभ उभारायची आज्ञा केली.

एस्तेर 6:1

त्याच दिवशी रात्री राजाला झोप येईना. म्हणून त्याने एका सेवकाला कालवृत्तांत आणायला सांगून वाचून दाखवायला सांगितला. (एखाद्या राजाच्या कारकिर्दीतील सगव्व्या घडामोडी या राजंच्या इतिहासग्रंथात नोंदवलेल्या असतात.)

एस्तेर 7:10

तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.

एस्तेर 10:2

आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले.

मलाखी 3:16

देवाचे अनुयायी एकमेकांशी बोलले व परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या समोर पुस्तक आहे. त्यामध्ये देवाच्या अनुयायांची नावे आहेत. हेच लोक देवाच्या नावाला मान देतात.

Interlinear

Choose Theme