एस्तेर 2:20 · मराठी बायबल
एस्तेरने आपण यहुदी असल्याचे अजूनही गुपित ठेवले होते. आपली कौंटुबिक पार्श्वभ्मी तिने कोणाला कळू दिली नव्हती. मर्दखयनेच तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.
Cross references
एस्तेर 2:7
त्याला हदस्सा नावाची एक चुलत बहीण होती. तिला आईवडील नसल्यामुळे मर्दखयनेच तिचा सांभाळ केला होता. तिचे आईवडील वारलें तेव्हा मर्दखयने तिला आपली मुलगी मानून तिला वाढवले. हदस्सालाच एस्तेर म्हणत. ती अतिशय रुपवती आणि सुरेख होती.
एस्तेर 2:10
आपण यहुदी आहोत हे एस्तेरने कुणालाही सांगितले नव्हते. मर्दखयने बजावल्यामुळे तिने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कोणालाही सांगितली नव्हती.
इफिसकरांस 6:1
मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे.