Home Bibles इफिसकरांस 6:23 · मराठी बायबल
इफिसकरांस 6:23 · मराठी बायबल

देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो.

Cross references

उत्पत्ति 43:23

परंतु योसेफाच्या घरच्या कारभाऱ्याने उत्तर दिले, “भिऊ नका; माझ्यावर विश्वास ठेवा; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात देणगी म्हणून ते पैसे ठेवले असतील. मागच्या खेपेच्या धान्याचे पैसे तुम्ही मला दिले याची मला पक्की आठवण आहे.”नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.

1 शमुवेल 25:6

दावीदाने याखेरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना?

स्तोत्रसंहिता 122:6

ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.

योहान 14:27

“शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका.

रोमकरांस 1:7

ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.

1 करिंथकरांस 1:3

देव पिता आणि त्यांचा व आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा व शांति असो.

गलतीकरांस 5:6

कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांनाकाही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.

गलतीकरांस 6:16

तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दयाअसो.

1 थेस्सलनीकाकरांस 5:8

परंतु आपण दिवसाचे असल्याने स्व:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.

2 थेस्सलनीकाकरांस 1:3

बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे.

2 थेस्सलनीकाकरांस 3:16

आता प्रभु स्वत: जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला सर्वकाळ आणि सर्व प्रकारे शांति देवो, प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.

1 तीमथ्याला 1:3

मी मासेदोनियाला जात असता तुला कळकळीने विनंति केल्याप्रमाणे तू इफिस येथे राहावेस असे माझे म्हणणे आहे. यासाठी की, काही ठराविक लोकांना खोटे शिक्षण देऊ नका अशी तुला त्यांना आज्ञा करता यावी. किंवा

1 तीमथ्याला 1:14

परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.

1 तीमथ्याला 5:8

पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.

फिलेमोना 1:5

कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो,

1 पेत्र 5:14

तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा. तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.

प्रकटीकरण 1:4

योहानाकडून, आशियाप्रांतातील सात मंडळ्यांना:जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडूनतुम्हांस कृपा व शांति असो.

Interlinear

Choose Theme