Cross references
परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “साराय तुझी मालकीण आहे, तू तिच्याकडे घरी परत जा आणि तिच्या आज्ञेत राहा.”
एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची मुले यांना तो राजा म्हणून मान्य होता आणि ते सगळे त्याच्या आज्ञेत होते.
तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही.’ आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत.
पण माझ्या आधी सतेवर असलेल्या राज्यपालांनी लोकांना त्रस्त केले. या अधिकाऱ्यांनी लोकांना प्रत्येकी एक पौंड चांदी बळजबरीने द्यायला लावली. लोकांना त्यांनी अन्न आणि द्राक्षारस द्यायला भाग पाडले. या राज्यपालांच्या हाताखालच्या प्रमुखांनीही लोकांवर सत्ता गाजवली आणि त्यांचे जिणे खडतर केले. पण मी देवाविषयी भय आणि आदर बाळगला. त्यामुळे अशा गोष्टी केल्या नाहीत.
मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.
प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत.
प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभुसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.
प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दुषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वत:ला शुद्ध ठेऊ या. देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊ या.
परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एकसबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा).
पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा.
पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वत:पेक्षा चांगले माना.
स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे.
तो पैशावर प्रेम करणारा नसावा. त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत.
आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा.
सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.
त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, पण दीनावर कृपा करतो.” नीतिसूत्रे 3:34