Home Bibles उपदेशक 7:21 · मराठी बायबल
उपदेशक 7:21 · मराठी बायबल

लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल.

Cross references

1 शमुवेल 10:27

पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली

2 शमुवेल 16:10

पण राजा त्याला म्हणाला, “सरुवेच्या मुलानो, मी काय करु? शिमी मला शाप देत आहे. पण परमेश्वरानेच त्याला तसे करायला सांगितले आहे.”

2 शमुवेल 19:19

तो राजाला म्हणाला, “स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करु नका. महाराज, तुम्ही यरुशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरुन जा.

नीतिसूत्रे 30:10

सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.

यशया 29:21

(हे लोक सज्जनांना खोटे पाडतात. लोकांना न्यायालयात खेचून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. ते भोळ्या लोकांना उध्वस्त करण्याचा यत्न करतात.

1 करिंथकरांस 13:5

ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही,

Interlinear

Choose Theme