Home Bibles उपदेशक 5:15 · मराठी बायबल
उपदेशक 5:15 · मराठी बायबल

माणूस त्याच्या आईच्या उदरातून जगात येतो तेव्हा काहीही न घेता येतो. आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हाही तो त्याच प्रकारे जातो. काहीही न घेता. तो गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो बरोबर काहीही नेत नाही. तो ज्या रीतीने जगात येतो त्याच रीतीने जातो.

Cross references

ईयोब 1:21

तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”

ईयोब 15:2

“ईयोब, जर तू खरोखरच शहाणा असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस. शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.

स्तोत्रसंहिता 49:17

ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत. या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत.

होशेय 12:2

परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

लूक 12:20

पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’

1 तीमथ्याला 6:7

कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही.

Interlinear

Choose Theme