मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे.
Cross references
“तुमची भरभराट करायला आणि तुमची संरव्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसानळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल.
तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
एक तरी माणूस असा आहे का ज्याने माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आयुष्य उपभोगले? नाही. आणि मी हे शिकलो: माणसाला करता येण्यासारखी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि त्याला करायला लागणारे काम आवडीने करणे. हे सर्व देवाकडूनयेते हेही मी पाहिले.
म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.
म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.
तेव्हा आता जा, तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा. द्राक्षारस (मद्य) प्या आणि आनंदी व्हा. तुम्ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल.
तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा.
जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, त्यांच्याबरोबर तू असतोस. ते लोक तुझ्या चालीरीतींची आठवण ठेवतात. पण देवा, पूर्वी आम्ही तुझ्याविरूध्द जाऊन पाप केले म्हणून तू आमच्यावर रागावलास. आता, आमचे रक्षण कसे होणार?
पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वत: मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वत: म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
प्रभूमध्ये नेहमी आनंद करा.
कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वत:जवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी.