Home Bibles उपदेशक 12:1 · मराठी बायबल
उपदेशक 12:1 · मराठी बायबल

तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले”असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.

Cross references

उत्पत्ति 39:2

परंतु परमेश्वराने योसेफाला सहाय्य केले म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. योसेफ आपला स्वामी मिसरचा रहिवासी पोटीफर याच्यास घरी राहात असे.

उत्पत्ति 39:8

परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. तो म्हणाला, “पाहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्याने माझ्या ताब्यात देऊन त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.

उत्पत्ति 39:23

तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.

अनुवाद 8:18

तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.

1 शमुवेल 1:28

आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवलेआणि परमेश्वराची भक्ती केली.

1 शमुवेल 2:18

पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी.

1 शमुवेल 2:26

शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.

1 शमुवेल 3:19

शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही.

1 शमुवेल 16:7

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

1 शमुवेल 16:12

इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”

1 शमुवेल 17:36

सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथचीही मी तशीच गत करीन. आपल्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो. त्याला मृत्यूला सामोरे जायलाच पाहिजे.

2 शमुवेल 19:35

“मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करु शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुझ्यामागे लोढणे कशाला लावून देऊ?

2 शमुवेल 19:36

आता मला तुझ्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक. यार्देन नदी मी उतरुन तुझ्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?”

1 राजे 3:6

शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्याच्यानंतर त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.

1 राजे 14:13

सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्यताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे.

1 राजे 18:12

तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे.

2 इतिहास 34:2

त्याने वर्तन योग्य प्रकारचे होते. परमेश्वराची त्याच्या कडून जशी अपेक्षा होती तसेच तो वागला. आपला पूर्वज दावीद याच्याप्रामाणे त्याने सत्कृत्ये केली. सन्मार्गावरुन तो ढळला नाही.

ईयोब 30:2

त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.

स्तोत्रसंहिता 22:9

देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस. मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस. मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस. आणि माझे सांत्वन केले आहेस.

स्तोत्रसंहिता 34:11

मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.

स्तोत्रसंहिता 71:17

देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.

स्तोत्रसंहिता 90:10

आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.

नीतिसूत्रे 8:17

मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.

नीतिसूत्रे 22:6

लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.

उपदेशक 11:8

तुम्ही कितीही जगलात तरी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक दिवस उपभोगला पाहिजे. पण तुम्ही मरणार आहात याची आठवण ठेवा. तुम्ही जिवंत असाल त्यापेक्षा अधिक काळ मेलेले असाल. आणि मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही.

उपदेशक 11:10

रागाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि शरीराला पाप करायला प्रवृत्त करू नका.आयुष्याच्या पहाटे तरुण असताना लोक मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात.

यशया 26:8

पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.

विलापगीत 3:27

परमेश्वराचे जोखड वाहणे केव्हाही बरेच. ते तरूणपणापासून वाहणे तर फारच चांगले.

दानीएल 1:8

दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वत:ला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.

दानीएल 1:17

देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.

होशेय 7:9

परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात. पण एफ्राईमला ते कळत नाही. त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत. पण ते त्याला माहीत नाही.

लूक 1:15

देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

लूक 2:40

बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.

लूक 18:16

पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासरख्यांचेच आहे.

इफिसकरांस 6:4

आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.

2 तीमथ्थाला 3:15

तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.

Interlinear

Choose Theme