Home Bibles उपदेशक 10:6 · मराठी बायबल
उपदेशक 10:6 · मराठी बायबल

मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात.

Cross references

शास्ते 9:14

शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, “तू ये आणि आम्हावर राज्य कर.”

1 राजे 12:13

त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.

एस्तेर 3:1

या सर्व घडामोडी झाल्यानंतर राजाने अगागी हामानाचा गौरव केला. अगागी हामान हा हम्मदाथा याचा मुलगा. राजाने हामानला बढती देऊन इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा मानाची जागा त्याला दिली.

स्तोत्रसंहिता 12:8

ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत. ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्तअसतात.

नीतिसूत्रे 28:12

चांगले लोक नेते बनले की सर्वजण आनंदी असतात. पण वाईट माणूस निवडून आला की सर्व लपून बसतात.

नीतिसूत्रे 28:28

दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील.

नीतिसूत्रे 29:2

राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.

याकोब 2:3

आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.”

Interlinear

Choose Theme