Home Bibles उपदेशक 10:18 · मराठी बायबल
उपदेशक 10:18 · मराठी बायबल

जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.

Cross references

नीतिसूत्रे 12:24

जे लोक खूप काम करतात त्यांना इतर कामगारांवर देखरेख करण्याचे काम देतात. पण आळशी माणसाला गुलामासारखे राबावे लागते.

नीतिसूत्रे 14:1

शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.

नीतिसूत्रे 20:4

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

नीतिसूत्रे 21:25

आळशी माणूस अधिकाचा हव्यास धरुन आपला नाश करुन घेतो. तो स्वत:चा नाश करतो कारण तो त्या गोष्टींसाठी कष्ट करायला नकार देतो पण चांगला माणूस दान देतो कारण त्याच्याकडे भरपूर असते.

नीतिसूत्रे 23:21

जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही.

नीतिसूत्रे 24:30

मी आळशी माणसाच्या शेताजवळून जात होतो. मी शहाणा नसलेल्या माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. त्या

इब्री लोकांस 6:11

पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.

2 पेत्र 1:5

म्हणून याकारणासाठी आपल्या कडून होता होईल ते प्रयत्न करुन देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,

Interlinear

Choose Theme