Home Bibles अनुवाद 9:22 · मराठी बायबल
अनुवाद 9:22 · मराठी बायबल

“नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त केलेत.

Cross references

निर्गम 17:2

तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”

निर्गम 17:7

मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.

गणना 11:1

मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला.

गणना 11:3

त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्निमुळे छावणीचा भाग जळून गेला.

गणना 11:4

जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे.

गणना 11:34

म्हणून लोकांनी त्या ठिकाणाला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ह्याच ठिकाणी, ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय कडक इच्छा झाली होती त्यांना पुरण्यात आले.

अनुवाद 33:8

लेवींविषयी मोशे असे म्हणाला,“लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.

Interlinear

Choose Theme