Home Bibles अनुवाद 9:13 · मराठी बायबल
अनुवाद 9:13 · मराठी बायबल

“तो असेही म्हणाला, ‘त्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. ते फार हट्टी आहेत.

Cross references

उत्पत्ति 11:5

परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले.

उत्पत्ति 18:21

म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.”

निर्गम 32:9

परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते फार ताठमानेचे लोक आहेत; ते नेहमी मजविरुद्ध उठतात.

अनुवाद 9:6

तेव्हा तुमचा चांगूलपणा याला कारणीभूत नाही. उलट, खरे सांगायचे तर तुम्ही फार हटृ लोक आहात.

अनुवाद 10:16

“तेव्हा हट्टीपणा सोडा. आपली अंत:करणे परमेश्वराला द्या.

अनुवाद 31:27

तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.

2 राजे 17:14

पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वरा ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.

स्तोत्रसंहिता 50:7

देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका! इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन. मी देव आहे. तुमचा देव आहे.

यिर्मया 7:11

हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 13:27

मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत.जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”

होशेय 6:10

इस्राएलमध्ये भयंकर गोष्ट मी पाहीली आहे. एफ्राईम परमेश्वाशी निष्ठावान नाही इस्राएल पापाने बरबटली आहे.

मलाखी 3:5

मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

Interlinear

Choose Theme