Home Bibles अनुवाद 8:11 · मराठी बायबल
अनुवाद 8:11 · मराठी बायबल

“सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.

Cross references

अनुवाद 4:1

“इस्राएल लोकहो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो ते नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल.

अनुवाद 4:5

“परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले.

अनुवाद 6:11

उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हांला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.

अनुवाद 7:11

जेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.

अनुवाद 11:32

मी आज सांगितलेले नियम, विधी यांचे पालन करा.

शास्ते 3:7

इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले.

स्तोत्रसंहिता 106:21

देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.

नीतिसूत्रे 1:32

“मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो.

नीतिसूत्रे 30:9

माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन.

यिर्मया 23:27

हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली,

यहेज्केल 16:10

मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली.

होशेय 2:8

“तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.

Interlinear

Choose Theme