तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.
Cross references
आज मी तुम्हाला त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
“आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.
ते माझ्याशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.’
“आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि वाढून एक महान राष्ट्र बनाल. तुमच्या राष्ट्राची भरभराट होईल. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेला प्रदेश तुम्ही ताब्यात घ्याल.
“आता, हे इस्राएल लोकांहो तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंत:करणाने व जीवाने त्याची सेवा करावी.
त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला.
तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये.
दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.
का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.
जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील.
परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.
तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’
दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते.
नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल.
कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.