Home Bibles अनुवाद 4:43 · मराठी बायबल
अनुवाद 4:43 · मराठी बायबल

ती नगरे अशी: रऊबेनींसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलादमधील रामोथ आणि मनश्शे लोकांसाठी बाशान मधील गोलान.

Cross references

यहोशवा 20:8

यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.

यहोशवा 21:27

लेवी वंशातील गेर्षोन कुळाला ही काही नगरे मिळाली. ती अशी:मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्यांना बाशान मधील गोलान दिले (गोलान हे आश्रयस्थान होते.) बैश्तरा देखील दिले. म्हणजेच एकंदर दोन नगरे व शिवार दिली.

यहोशवा 21:38

गाद वंशातील लोकांनी गिलादमधील रामोथ (हे आश्रयाचे नगर) दिले. शिवाय महनाईम,

1 राजे 4:13

रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गेब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दखवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.

1 राजे 22:3

यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”

1 इतिहास 6:63

मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.

1 इतिहास 6:66

एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.

1 इतिहास 6:71

गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.

1 इतिहास 6:80

मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलादमधील रामोथ, महनाइम, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या शिवारासकट मिळाली.

Interlinear

Choose Theme