“त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हाला आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
Cross references
मग चारशे तीसव्या वर्षातील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राहिल्यानंतर परमेश्वराच्या सर्व सेना म्हणजे सर्व इस्राएल लोक मिसर देशातून निघाले.
अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर नेले व ते गटगटांनी गेले.
मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हांस गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
“हा सणाचा दिवस म्हणजे जणू काय तुम्हाला आठवण देण्याकरिता तुमच्या हाताला बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल, तो तुम्हाला डोव्व्यांच्या दरम्यान चिन्ह असा होईल.त्याच्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या शिकवणुकीची आठवण होईल. तसेच परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले याची आठवण करण्यास तो तुम्हाला मदत करील.
“पुढील काळीं तुमची मुले बाळे विचारतील की तुम्ही असे का करिता म्हणजे हा सण का पाळिता? ते म्हणतील, ‘या सर्वाचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही उत्तर द्यावे, ‘आम्ही मिसरमध्ये गुलामगिरीत होतो परंतु परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून सोडवून येथे आणले.
परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
पण आम्ही परमेश्वराकडे मदतीची याचना केली. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठविले. परमेशवराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.“आता आम्ही कादेशमध्ये आहोत. इथे तुझा प्रदेश सुरु होतो.
दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या परमेश्वराने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने या महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले आहे. त्याने आपले सामर्थ्य व प्रताप तुम्हाला दाखवले आहेत. कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांतून तुम्ही गेलात. तुम्ही अनेक चमत्कार व नवलपूर्ण गोष्टी पाहिल्यात. तसेच युद्ध आणि भयानक घटनाही पाहिल्यात.
कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला दास्यातून मुक्त करुन परमेश्वराने तुम्हाला मिसर बाहेर आणले, फारोच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना दिलेले वचन त्याला पाळायचे होते.
तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. त्यांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
त्याचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातर त्याने इतरांना वगळून तुम्हांला आपले मानले. आजही वस्तूस्थिती तीच आहे.
अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो.
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.
तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.”
परमेश्वराच्या बाहूंनो जागे व्हा (सामर्थ्या) जागा हो ऊठ आणि बलवान हो. प्राचीन काळी वापरली होतीस तशी तुझी शक्ती वापर. राहाबचा पराभव करणारी शक्ती तूच आहेस. तू आक्राळ-विक्राळ मगरीचा पराभव केलास.
लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.”
परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.”पण तुम्ही म्हणालात, “कशावरुन तू आमच्यावर प्रेम करतोस?”परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.
आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.