इस्राएलचे सर्व लोक आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
Cross references
इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.
परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”
लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा कोणत्या माणसाचे म्हणणे खरे आहे हे मी ठरवितो. ह्याप्रमाणे मी लोकांना दवाचे नियम व विधी यांचे शिक्षण देतो.”
तू लोकांची गाऱ्हाणी ऐकत असावेस व त्याचबरोबर त्यांसंबंधी देवाकडे बोलतही रहावेस असा मी तुला सल्ला देतो, त्यात देव तुझ्याबरोबर असो अशी मी प्रार्थना करतो.
तू आम्हाला वाळवंटात दूध आणि मध असलेल्या प्रदेशातून आणले आहेस. तू आम्हाला वाळवंटात ठार मारायला आणले आहेस. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
देवाला याकोबाच्या माणसात काही चूक दिसली नाही. इस्राएल लोकांमध्ये देवाला पाप दिसले नाही. परमेश्वर त्यांचा देव आहे आणि तो त्यांच्या बरोबर आहे. थोर राजा त्यांच्या बरोबर आहे.
“पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला. खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला! आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
“हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.”
शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.”
(त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)