Home Bibles ☰ Books अनुवाद 33:11 · मराठी बायबल
अनुवाद 33:11 · मराठी बायबल

परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्वीकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.”

Cross references

गणना 18:8

नंतर परमेश्वर अहरोनला म्हणाला, “लोक मला ज्या खास भेटी देतात त्यांची जबाबदारी मी स्वत: तुझ्यावर टाकली आहे. इस्राएलाचे लोक ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. त्या नेहमीच तुमच्या राहतील.

गणना 35:2

“इस्राएल लोकांना सांग की त्यांनी त्यांच्या भागातील काही शहरे लेवी लोकांना दिली पाहिजेत. इस्राएल लोकांनी काही शहरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना दिली पाहिजेत.

अनुवाद 18:1

“लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.

2 शमुवेल 24:23

महाराज, हवे ते मी तुम्हाला देईन.” महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.

स्तोत्रसंहिता 20:3

तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.

यशया 29:21

(हे लोक सज्जनांना खोटे पाडतात. लोकांना न्यायालयात खेचून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. ते भोळ्या लोकांना उध्वस्त करण्याचा यत्न करतात.

यिर्मया 15:10

माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.

यिर्मया 17:18

लोक मला त्रास देतात. त्यांना तू खजील कर. पण माझी निराशा करु नकोस. त्यांना धाक दाखव पण मला घाबरवू नकोस तो भयंकर अरिष्टाचा दिवस माझ्या शत्रूंवर आण आणि त्यांचा पुन्हा पुन्हा बिमोड कर.

यहेज्केल 20:40

परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “लोकांनी माझ्या पवित्र डोंगरावर इस्राएलच्या उंच पर्वतावर माझी सेवा करण्यासाठी आलेच पाहिजे. सर्व इस्राएलचे लोक त्यांच्या भूमीवर असतील. ते त्यांच्या स्वत:च्या देशात असतील. माझा सल्ला विचारायला येण्याची तीच जागा आहे. तेथेच तुम्ही मला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्या जागीच तुम्ही मला अर्पण करण्यासाठी तुमच्या पिकाचा पहिला भाग आणलाच पाहिजे. तुमची पवित्र दाने तेथेच तुम्ही मला दिली पाहिजेत.

यहेज्केल 43:27

वेदी तयार करुन, परमेश्वराला अर्पण करण्यात सात दिवस जातील. आठव्या दिवसापासून, याजक होमार्पणे व शांत्यर्पणे करु शकतील आणि मी तुमचा स्वीकार करीन.” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला.

आमोस 5:10

संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.

मलाखी 1:8

यज्ञ करण्यासाठी तुम्ही अंधळी जनावरे आणता. हे चूक आहे. यज्ञबली म्हणून तुम्ही आजारी व पंगू जनावरे आणता हे बरोबर नाही. अशी आजारी जनावरे राज्यपालाला द्यायचा प्रयत्न करा. तो भेट म्हणून अशा रोगी जनावरांचा स्वीकार करील का? नाही तो त्यांचा स्वीकार करणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

Interlinear

Choose Theme