“आठवा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल. महाजनांना विचारा, ते सांगतील.
Cross references
“पुढील काळीं तुमची मुले बाळे विचारतील की तुम्ही असे का करिता म्हणजे हा सण का पाळिता? ते म्हणतील, ‘या सर्वाचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही उत्तर द्यावे, ‘आम्ही मिसरमध्ये गुलामगिरीत होतो परंतु परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून सोडवून येथे आणले.
“असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकिवात तरी आहे का?
तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.”
“वृध्दांना त्यांचे पूर्वज काय काय शिकले ते विचार.
आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो. खूप दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो.
रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी स्व:तशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का? तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का?
परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे. देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.
आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत.
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?