Home Bibles ☰ Books अनुवाद 32:37 · मराठी बायबल
अनुवाद 32:37 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणेल, ‘कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा ‘दुर्ग’?

Cross references

शास्ते 10:14

त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करु द्या.”

2 राजे 3:13

अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.”तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”

यिर्मया 2:28

त्या मूर्तींना येऊ देत आणि तुम्हाला वाचवू देत. तुम्ही स्वत: घडविलेल्या त्या मूर्ती कोठे आहेत? तुम्ही संकटात असताना त्या मूर्ती येऊन तुम्हाला सोडवितात का ते पाहू या. यहूदा, तुला तुझ्या शहरांइतक्या मूर्ती आहेत!

यिर्मया 11:12

यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

Interlinear

Choose Theme