Home Bibles अनुवाद 29:12 · मराठी बायबल
अनुवाद 29:12 · मराठी बायबल

तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे.

Cross references

निर्गम 6:7

तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. मी तुमचा देव परमेश्वर आहे आणि मी तुम्हाला मिसरमधून सोडविले आहे हे तुम्हाला समजेल.

निर्गम 19:5

म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.

अनुवाद 1:8

पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.”‘

अनुवाद 5:2

होरेब पर्वताजवळ असताना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर कारार केला होता.

अनुवाद 26:17

परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.

अनुवाद 28:9

परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल.

अनुवाद 29:14

हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे.

यहोशवा 24:25

मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले.

2 राजे 11:17

यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.

2 इतिहास 15:12

तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.

नहेम्या 10:28

मग ह्या सर्व लोकांनी देवापुढे विशेष शपथ घेतली. आणि जर आपण ही शपथ पाळली नाही तर दुर्घटना घडू देत अशी त्यांनी मागणी केली. या सर्व लोकांनी देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ वाहिली. देवाचे हे नियमाशास्त्र आम्हाला त्यांचा सेवक मोशे याच्या कडून मिळालेले आहे. या लोकांनी आपल्या परमेश्वराच्या देवाच्या सर्व आज्ञा, नियम, आणि शिकवण यांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे वचन दिले. हे वचन पुढील लोकांनी दिले. वरिल लोकांखेरीज उरलेले सर्व लोक याजक, लेवी, द्वारपाल, गायक, मंदिराचे सेवक आणि अवतीभवतीच्या इतर लोकांपासून वेगळे झालेले इस्राएलमधील सर्व लोक देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी ते आपण होऊन वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व बायका, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व मुलगे आणि मुली. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तर्ीसमवेत देवाचे नियमशास्त्र पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला.

Interlinear

Choose Theme