परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.
Cross references
फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.”
“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे.
त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
कारण, पुरते नेस्तनाबूत होण्यासाठी, मारले जाण्यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. कारण राजाला तसदी देण्याइतकी ती समस्या गंभीर ठरली नसती.”
त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले.
यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील.
इस्राएलींना बळी देणे आवडते. ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात. परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही. त्याला त्यांची पापे स्मरतात. म्हणून तो त्यांना शिक्षा करील. कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल.
त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.
ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.