“कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी तारण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल.
Cross references
तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर
कोणी तुझ्याकडे पैसे मागितले व ते परत करण्याची हमी म्हणून आपले पांघरून तुझ्याजवळ गहाण ठेवण्यास दिले तर दिवस मावळण्याआधी तू त्याचे पांघरुन त्याला परत करावे;
“युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वत:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधीतुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुइयामध्ये आढळणार नाही तुझ्या येथे जात्याचा आवाज कधीऐकू येणार नाही.