त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे.
Cross references
याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये.
भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी राहात असेल तर मग आपल्या बापाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे.
“विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो.
तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.