Home Bibles अनुवाद 21:17 · मराठी बायबल
अनुवाद 21:17 · मराठी बायबल

त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.

Cross references

उत्पत्ति 25:5

मरण्यापूर्वी अब्राहामाने आपल्या गुलाम स्त्रियांच्या मुलांसाठी काही देणग्या दिल्या; त्याने या मुलांना इसहाकापासून वेगळे करुन दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले; नंतर त्याने आपली सगळी मालमत्ता इसहाकाला दिली.

उत्पत्ति 25:31

परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”

उत्पत्ति 49:3

“रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस: पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पाहिला पुरावा आहेस. तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस;

1 इतिहास 5:1

रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले. हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.

2 इतिहास 21:3

यहोशाफाटने आपल्या मुलांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या - रुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.

स्तोत्रसंहिता 105:36

आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.

Interlinear

Choose Theme