तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करु नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”‘
Cross references
अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली गरोदर राहिल्या. त्यांचे वडीलच त्यांच्या बांळांचे वडील होते.
धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावला वतन म्हणून दिला आहे.
“परमेश्वराने मला सांगितले, ‘मवाबाला उपद्रव पोचू देऊ नका. त्यांना युद्धाला प्रवृत करु नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.”‘
अम्मोन्यांचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही मोर्चा वळवला नाही. कारण आमच्या परमेश्वराने तेथे जाण्यास बंदी केली होती.
अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या आधिपत्याखाली असलेली सर्व गावे या प्रदेशात होती. हा राजा हेशबोनहून राज्य करत होता. अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सर्व नगरे
त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”
संदेश असा होता:इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही.
“पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.