या एमींना लोक अनाकी यांच्यासारखे रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
Cross references
नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत - त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.”
तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले.
त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते.
पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”
आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या ( 12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.
तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याबद्दल आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.
त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य माणूस होता. त्याच्या भाल्याचे वजनच साडेसात पौंड होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.