Home Bibles अनुवाद 19:2 · मराठी बायबल
अनुवाद 19:2 · मराठी बायबल

इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे.

Cross references

निर्गम 21:13

परंतु जाणूनबुजून न ठरविता, अपघाताने एखाद्याचे हातून कोणी मेले तर देवाने हे घडू दिले असे समजावे. लोक सुराक्षिततेसाठी जाऊ शकतील अशा काही खास जागा मी निवडीन तो माणूस आपल्या सुरक्षिततेसाठी मी निवडलेल्या विशेष ठिकाणापैकी एके जागी पळून जाऊ शकेल.

गणना 35:10

“लोकांना या गोष्टी सांग: तुम्ही लोक यार्देन नदी पार करुन कनानच्या प्रदेशात जाल.

अनुवाद 3:18

“त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.

अनुवाद 4:41

मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.

अनुवाद 4:42

अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, न जाणता एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये.

यहोशवा 20:2

इस्राएल लोकांना सांग “मोशे मार्फत मी माझी आज्ञा तुमच्यापर्यंत पोचवली. मोशेने तुम्हाला सुरक्षिततेसाठी खास नगरे उभारायला सांगितले.

इब्री लोकांस 6:18

देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.

Interlinear

Choose Theme