अनुवाद 17:13 · मराठी बायबल
हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
Cross references
गणना 15:30
पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहो हे त्याला कळत असले, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसासाठी सारखाच नियम आहे.
अनुवाद 13:11
ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही धास्ती घेतील, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत.
अनुवाद 13:12
“तुम्हाला राहाण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की
अनुवाद 19:20
“पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.