Home Bibles अनुवाद 13:7 · मराठी बायबल
अनुवाद 13:7 · मराठी बायबल

तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे जे लोक आहेत त्यांचे हे दैवत होत.)

Cross references

गणना 25:4

परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल.त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”

अनुवाद 6:14

तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.

यहोशवा 24:15

“पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”

2 इतिहास 22:3

अहज्याची वागणूकही अहाबच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.

यिर्मया 44:15

मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी स्त्रिया, दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांच्या पतींना ते माहीत होते. पण त्यांनी त्या स्त्रियांना असे करण्यापासून परावृत्त केले नाही. तेथे असलेल्या यहूदी लोकांचा एक मोठा समुदाय एकत्र येत होता. हे लोक मिसरच्या दक्षिण भागात राहात होते. ज्या स्त्रिया दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांचे पती यिर्मयाला म्हणाले.

Interlinear

Choose Theme