तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
Cross references
मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीकदेणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
म्हणून मी आत्ताच तुम्हाला सावध करत आहे. स्वर्ग आणि पृथ्वी याला साक्ष आहेत. ही नीच गोष्ट कराल तर तुमचा नाश त्वरीत होईल. तुम्ही त्या प्रदेशात वस्ती करायला यार्देन नदी पार करत आहात. पण मूर्ती केल्यात तर मात्र तुम्ही तेथे फार काळ राहणार नाही. नव्हे, तुमचा सर्वस्वी नायनाट होईल.
तुमचा देव परमेश्वर सतत तुमच्या बरोबर आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
“तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच ही ताकीद मी आत्ताच तुम्हाला देऊन ठेवतो.
आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.
पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजनपूजन केलेत तर
शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.
“कधी त्यांच्या पापाचा दंड म्हणून तू त्यांच्या भूमीवर दुष्काळ पाडशील तेव्हा ते या ठिकाणाकडे येऊन तुझी पार्थना करतील व तुझ्या नावाची स्तुती करतील. ते त्यांच्या पापांपासून परावृत होतील.
गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
“इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही आणि त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात क्षमायाचना केली, तू केलेल्या शिक्षेमुळे पापाचरण थांबवले,
कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा रोगाराईचा प्रसार केला
अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला.
“कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही खूप पिकाची अपेक्षा करता, पण पीक काढताना तुमच्या हाती फार थोडे धान्य लागते. ते धान्य तुम्ही घरी आणता आणि मी पाठविलेला वारा ते सर्व उधळून लावतो. हे का घडत आहे? का? कारण स्वत:च्या घराच्या काळजीने तुमच्यातील प्रत्येकजण घराकडे धाव घेतो. पण माझे घर मात्र अजूनही भग्नावस्थेत आहे.