Home Bibles अनुवाद 10:5 · मराठी बायबल
अनुवाद 10:5 · मराठी बायबल

मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या पेटीत ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.”

Cross references

निर्गम 25:16

देव म्हणाला, “मी तुला पवित्रकराराचा साक्षपट देईन तो तू पवित्रकोशात ठेवावास.

निर्गम 25:21

“मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे.

निर्गम 32:15

मग मोशे पर्वतावरुन खाली उतरला; कराराच्या दोन सपाट पाट्या त्याच्या जवळ होत्या; त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना आज्ञा लिहिलेल्या होत्या.

निर्गम 34:28

मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न किंवा पाणी घेतले नाही; आणि मोशेने त्या पवित्रकराराची वचने - दहा आज्ञा - त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिली.

निर्गम 34:29

मग मोशे, पवित्रकरार लिहिलेल्या त्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजाने तळपत होता, परंतु ते त्याला ठाऊक नव्हते.

निर्गम 40:20

मोशेने करार घेऊन आज्ञापटाच्या कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.

अनुवाद 9:15

“मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.

अनुवाद 10:2

तो पुढे म्हणाला, ‘तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या पेटीत ठेव.’

यहोशवा 4:9

परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश घेऊन याजक ज्या ठिकाणी थांबले तेथे यहोशवाने बारा दगड ठेवले. ते आजही त्याठिकाणी आहेत.

1 राजे 8:8

हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.

Interlinear

Choose Theme