कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या
Cross references
तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्या बरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
“परमेश्वर हाच आमचा देव आहे.परमेश्वर हाच आमचा समर्य परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून ध्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका.
परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही.’ आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली.हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस.
सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूची धास्ती बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभु, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”
हे देवा, तू महान देव आहेस. दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस तू निष्ठा बाळगणारा आहेस. तू करार पाळतोस आमच्यावर अनेक आपत्ती आल्या आणि आमच्या अडचर्णीना तू महत्व देतोस आम्ही सर्वजण, आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.
सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.
देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील. ते माझा पराभव करु शकणार नाहीत. ते पडतील, त्यांची निराश होईल. त्यांची नामुष्की होईल आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.
परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
मग राजा दानीएलला म्हणाला,” तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास.
उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील. तो स्वत:बद्दल बढाया मारील. तो स्वत: करील. व स्वत:ला देवापेक्षा सुध्दा चांगले समजेल कोणीही ऐकल्या नसतील अशा गोष्टी तो सांगेल. देवांच्या देवाविरुध्द तो अशा गोष्टी सांगेल.सर्व वाईट घडेपर्यंत त्याला यश मिळेल.देवाने घडविण्याचे ठराविलेले घडेलच.
ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी आम्हांस माहीत आहे की, आपण प्रामाणिक आहात आणि कुणाची तमा न बाळगता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता. तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
पेत्राने बोलायला सुरुवात केली: “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
देवाजवळ पक्षपात नाही.
जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळेमला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्येकिंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही.
आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.
आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा.
ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे.आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”
त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे: