Home Bibles अनुवाद 1:13 · मराठी बायबल
अनुवाद 1:13 · मराठी बायबल

म्हणून मी तुम्हाला सांगितले, ‘आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना प्रमुख म्हणून नेमतो.’.

Cross references

उत्पत्ति 41:33

तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे;

निर्गम 18:21

तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.

गणना 11:16

तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल मंडळीतील सत्तर वडील मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या ह्या लोकांना दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.

प्रेषितांचीं कृत्यें 1:21

म्हणून आता दुसन्या वयक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्यामरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे, प्रभु येशू आपल्याबरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे, योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्या वेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकीच हा मनुष्य असला पाहिजे.’

प्रेषितांचीं कृत्यें 6:2

बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले. प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले.

Interlinear

Choose Theme