मला जाणून घ्यावयाच्या होत्या त्या गोष्टी समजावून घेण्यास गाब्रिएलने मला मदत केली. तो म्हणाला,”दानीएला, मी तुला ज्ञान देण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आलो आहे.
Cross references
मग मला माणसाचा आवाज ऐकू आला. तो उलई नदीवरून आला, तो आवाज मोठ्याने म्हणाला, गाब्रीएल ह्या माणसाला दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट कर.”
दानीएला, देवाने तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या पवित्र नगरीसाठी 70 आठवडे दिले आहेत. हे 70 आठवडे, वाईट गोष्टी व पाप करावयाचे सोडून द्यावे, लोकांना पवित्र करावे कायम राहाणारा चांगुलपणा आणावा,दुष्टान्त व संदेष्टे यांच्यावर शिक्कामोर्तब करावे, आणी पवित्र स्थान देवासाठी अर्पण केले जावे म्हणून दिले आहेत.
दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो.
मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो.
पण दानीएल, जाण्याआधी. प्रथम सत्याच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते मी तुला सांगितले पाहिजे, त्या दुष्ट देवदूतांच्या विरोधात माझ्या बाजूने मीखाएलशिवाय कोणीही उभा राहणार नाही. मीखाएल तुझ्या लोकांवर राज्य करणारा राजपुत्र (देवदूत) आहे.
मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”
मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्यासर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, ह्या गोष्टींचा अर्थ काय?”
तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलतानाऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणिमी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”