Home Bibles दानीएल 6:13 · मराठी बायबल
दानीएल 6:13 · मराठी बायबल

मग ते लोक राजाला म्हणाले,”दानीएल तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे राजा! तो यहूदाच्या कैद्यांपैकी एक आहे, तो तु केलेल्या कायद्याकडे लक्ष देत नाही अजूनही दिवसातून तीन वेळा तो त्याच्या देवाची प्रार्थना करतो.”

Cross references

एस्तेर 3:8

मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, “राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखुरलेले आहेत. इतर लोकांपेक्षा ते स्वत:ला वेगळे ठेवतात. इतरांपेक्षा त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. अशा लोकांना तुझ्या राज्यात राहू देणे हिताचे नाही.

दानीएल 1:6

दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते.

दानीएल 2:25

मग अर्योकने ताबडतोब दानीएलला राजाकडे नेले. अर्योक राजाला म्हणाला, महाराजांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एकजण मला यहूदातील कैद्यां मध्ये सापडला आहे.

दानीएल 3:8

ह्यांनंतर काही खास्दी राजाकडे येऊन यहूद्यांविरुध्द तक्रार करू लागले.

दानीएल 3:11

आणि तू असेही म्हणाला होतास की जो कोणी असे करणार नाही त्याला तापलेल्या भट्टीत टाकून देण्यात येईल.

दानीएल 3:12

पण राजा काही यहूद्यांनी तुझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले. त्यांना तू बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमलेस, शद्रख, मेशख,अबेद्नगो हेच ते यहूदी होत. ते तुझ्या दैवताला पूजत नाहीत. तू स्थापलेल्या मर्तोपुढे नतमस्तक होऊन, त्यांनी मूर्तोची पूजा केली नाही.

दानीएल 5:13

मग दानीएलला राजासमोर उभे करण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला,” तुझे नाव दानीएल आहे का? माझ्या वडिलांनी यहूदातून आणलेल्या कैद्यांपैकी तू एक आहेस का?

प्रेषितांचीं कृत्यें 5:29

पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही!

प्रेषितांचीं कृत्यें 17:7

यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्यानियमांविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की, आणखी एक राजा आहे. त्याचे नाव येशू आहे.”

Interlinear

Choose Theme