Home Bibles दानीएल 5:1 · मराठी बायबल
दानीएल 5:1 · मराठी बायबल

बेलशस्सर राजाने आपल्या हजार दरबाऱ्यांना मेजवानी दिली. राजा त्यांच्यासह मद्य पीत होता.

Cross references

उत्पत्ति 40:20

तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले.

एस्तेर 1:3

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते.

यशया 21:4

मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे. माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.

यशया 21:5

लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे. लोक म्हणत आहेत “जेवणाची तयारी करा. खा. प्या.” त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत “टेहळणीदार ठेवा. सेनाधिकाण्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”

यशया 22:12

म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील.

यशया 22:14

सर्वशक्तिमान परमेश्वराने सांगितलेल्या ह्या गोष्टी मी स्वत: माझ्या कानाने ऐकल्या. “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही अपराधी आहात. या अपराधांबद्दल क्षमा करण्यापूर्वीच तुम्ही मराल याची मला खात्री आहे.” माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले.

यिर्मया 51:39

ते शक्तिवान सिंहासारखे वागत आहेत. मी त्यांना मेजवानी देईन. मी त्यांना मद्य प्यायला लावीन. ते हसतील व मजा करतील. मग मात्र ते कायमचे झोपी जातील. ते पुन्हा कधीच उठणार नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

यिर्मया 51:57

बाबेलमधील ज्ञानी, महत्वाचे अधिकारी, राज्यपाल, इतर अधिकारी आणि सैनिक यांना मी मद्य पाजून झिंगायला भाग पाडीन. मग ते कायमचे झोपी जातील. परत कधीही उठणार नाहीत.” राजा असे म्हणाला. त्या राजाचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर.

नहूम 1:10

भांड्याखाली जळणाव्या काटेरी झुडपाप्रमाणे तुझा संपूर्ण नाश होईल सुक्या काटक्या जशा चटकन् जळून जातात, तसा तुझा पटकन् नाश होईल.

मार्क 6:21

मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली.

Interlinear

Choose Theme