तो खूप मोठ्याने बोलला, तो म्हणाला, वृक्ष तोडा, त्यांच्या फांद्या छाटा, पाने ओरबाडून काढा. त्याची फळे भोवताली विखरून टाका. मग वृक्षाखाली राहाणारे प्राणी दूर पळून जातील, फांद्यांवर राहाणारे पक्षी दूर उडून जातील.
Cross references
मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन.
स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बाबेलमधून दूर पळून जा. बाबेलच्या पापांबद्दल, मागे राहून, स्वत:वर मरण ओढवून घेऊ नका. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना परमेश्वराने सजा देण्याची वेळ आता आली आहे. बाबेलला योग्य अशीच सजा मिळेल.
आम्ही बाबेलला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्वपदावर येणे शक्य नाही, तेव्हा आपण तिला सोडून आपापल्या देशात जाऊ या. स्वर्गातील देव बाबेलच्या शिक्षेबद्दल आणि भवितव्याबद्दल निर्णय घेईल.
राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो.
तेव्हा राजाच्या वतीने घोषणा करणारा मोठ्याने म्हणाला,” निरनिराव्व्या राष्ट्रांतून आलेल्या व वेगवेगव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, लक्षपूर्वक ऐका! तुम्हाला पुढील आज्ञा करण्यात येत आहे:
त्या वृक्षाची पाने सुंदर होती. त्याला पुष्कळ चांगली फळे आली होती. त्या वृक्षापासून प्रत्येकाला भरपूर अन्न मिळत होते. वन्य प्राण्यांना त्या वृक्षाच्या छायेत आसरा मिळत होता, तर पक्षी फांद्यांवर राहात होते. प्रत्येकाला वृक्षापासून भक्ष्य मिळत होते.
राजा तू पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिलेस.तो देवदूत म्हणाला, वृक्ष तोडून टाका. क्ष्याचा नाश करा.पण खोड व मुळे राहू द्या. त्याभोवती लोखंड व कासे यांची जाळी बसवा त्याला गवतात राहू द्या तो दवात भिजेल. तो वन्य पशूंप्रमाणे राहील. सात पावसाळे (सात वर्ष) असे काढावे लागतील.
स्वप्न पडलेल्याला बारा महिने झाले. राजा नबुखद्नेस्सर एकदा त्याच्या बाबेलच्या राजवाड्याच्या छतावरून चालत असताना राजा म्हणाला पाहा! बाबेलकडे पाहा, हे प्रचंड शहर मी वसविले. हा माझा राजवाडा आहे. माझ्या सामर्थ्याच्या जोरावर मी हा राजवाडा बांधला.माझे मोठेपण दाखविण्यासाठीच मी तो बांधला.”
पण नबुखद्नेस्सरला गर्व झाला, तो दुराग्रही बनला. म्हणून त्याची सत्ता काढून घेेतली गेली. त्याला सिंहासन सोडावे लागले, त्याच्या वैभवाचा लोप झाला.
मग त्याला सक्तीने लोकांपासून दूर करण्यात आले.त्याचे हदय पशूप्रमाणे झाले. तो जंगली गाढवांबरोबर राहिला व त्याने गाईप्रमाणे गवत खाल्ले. तो दवात भिजला तो धडा शिकेपयैत त्याला हे भोगावे लागले. मगच त्याला पटले की मनुष्याच्या राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व असते, परात्पर देवाच्या इच्छेप्रमाणे राज्याचा राजा ठरविला जातो.
झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल.
जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.
आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
म्हणून तो माळयाला म्हणाला, “पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’
आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्दउच्चारले.
प्रचंड आवाजात तो ओरडला:“पडली! महान बाबेल पडली! ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे. आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय आणि प्रत्येक अशुद्ध,धिक्कारलेल्या पक्षांचा आश्रय झाली आहे.