“तो म्हणाला, दानीएला तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. संदेश गुप्त ठेवलेला आहे. अंताच्या क्षणापर्यंत तो गुप्तच राहील.
Cross references
यशया म्हणाला, “करार करा व त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.
हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.”
त्या काळासंबंधीचा व मी सांगितलेल्या गोष्टींसंबंधीचा दृष्टान्त खरा आहे. पण दृष्टान्त मोहोरबंद करून ठेव. (दृष्टान्त गुप्त ठेव) ह्या गोष्टी खूप काळांनंतर घडणार आहेत.”
“पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.’
जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, तीम्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.”