Home Bibles दानीएल 11:38 · मराठी बायबल
दानीएल 11:38 · मराठी बायबल

उत्तरेचा राजा कोणत्याच देवताची पूजा करणार नाही पण तो सत्तेची पूजा करील. सत्ता आणि बळ हेच त्याचे देव असतील. त्याच्या वाडवडिलांना त्याच्याप्रमाणे सत्तेचा लोभ नव्हता. तो सत्तेच्या देवाची सोने चांदी किंमती रत्ने आणि नजराणे ह्यांनी पूजा करतो.

Cross references

यशया 44:9

काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.

1 तीमथ्याला 4:1

आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

प्रकटीकरण 13:12

हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवरराहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता कीत्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती.

प्रकटीकरण 17:1

सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माइयाकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीचवेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे.

प्रकटीकरण 18:12

तो मालअसा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्याप्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवानलाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे.

Interlinear

Choose Theme