मग त्यानंतर उत्तरेच्या राजानंतर नवा राजा येईल. ऐश्वर्यात राहता यावे म्हणुन पुरेसा पैसा गोळा करण्यासाठी तो कर वसुली करणाऱ्याला पाठवील पण काही वर्षातच त्या राजाचा नाशा होईल. पण तो लढाईत मरणार नाही.
Cross references
त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
यहोयाकीमने फारोला सोने चांदी दिले तरी फारो-नखोला देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमने मग फारोनखोला पैसे दिले.
जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.
“आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.
पण तिच्याच कुटुंबातील एकजण (दक्षिणेच्या राजाची)जागा घेईल तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करील.
त्याच्या मागून एक अतिशय क्रूर व तिरस्करणीय माणूस येईल, राजघराण्यातील असण्याची त्याची योग्याता नसेल.