Home Bibles दानीएल 10:18 · मराठी बायबल
दानीएल 10:18 · मराठी बायबल

माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली.

Cross references

1 शमुवेल 23:15

झीफच्या वाळवंटात होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहून दावीद घाबरला.

ईयोब 16:5

पण मी तुम्हाला धीर देऊ शकलो असतो आणि माझ्या बोलण्याने तुमच्यात आशा निर्माण केली असती.

ईयोब 23:6

देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.

स्तोत्रसंहिता 138:3

देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस.

यशया 35:3

दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा.

दानीएल 8:18

गाब्रीएल बोलत असताना मी जमिनीवर पडलो व झोपी गेलो. मला अगदी गाढ झोप लागली. मग गाब्रीएलने मला स्पर्श केला व माझ्या पायावर उभे केले.

दानीएल 10:10

मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो.

दानीएल 10:16

मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे.

लूक 22:32

परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना कसून केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.

लूक 22:43

स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला

प्रेषितांचीं कृत्यें 18:23

तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.

2 करिंथकरांस 12:9

पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे.

इफिसकरांस 3:16

मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी.

फिलिप्पैकरांस 4:13

जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्यार द्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.

कलस्सैकरांस 1:11

त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.

Interlinear

Choose Theme