Home Bibles कलस्सैकरांस 3:14 · मराठी बायबल
कलस्सैकरांस 3:14 · मराठी बायबल

या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते.

Cross references

योहान 13:34

‘मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा.

योहान 15:12

जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे.

योहान 17:23

मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.

रोमकरांस 13:8

एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे.

1 करिंथकरांस 13:1

मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.

इफिसकरांस 1:4

ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे.

इफिसकरांस 4:3

शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा.

इफिसकरांस 5:2

आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.

कलस्सैकरांस 2:2

यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे.

1 थेस्सलनीकाकरांस 4:9

आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे.

1 तीमथ्याला 1:5

आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीति आहे, जी शुद्ध अंत:करणातून, चांगल्या सदसदविवेकबुद्धीतून व प्रामाणिक विश्वासातून उगम पावते.

इब्री लोकांस 6:1

म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ.

1 पेत्र 4:8

सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.

2 पेत्र 1:7

आणि देवाच्याप्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या.

1 योहान 3:23

तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्हीविश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे.

1 योहान 4:7

प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण

1 योहान 4:21

आम्हांलाख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.

Interlinear

Choose Theme