Home Bibles कलस्सैकरांस 1:4 · मराठी बायबल
कलस्सैकरांस 1:4 · मराठी बायबल

कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे.

Cross references

2 करिंथकरांस 7:7

त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माइयाबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे.

गलतीकरांस 5:6

कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांनाकाही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.

इफिसकरांस 1:15

यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले,

कलस्सैकरांस 1:9

या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की: तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे.

1 थेस्सलनीकाकरांस 1:3

आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.

1 थेस्सलनीकाकरांस 3:6

पण तीमथ्य आताच तुमच्याकडून परत आला आहे. आणि त्याने आम्हांला तुमचा विश्वास व प्रिति याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हांला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत, तसे तुम्हीही झाला आहात.

1 थेस्सलनीकाकरांस 4:9

आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे.

2 थेस्सलनीकाकरांस 1:3

बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे.

फिलेमोना 1:5

कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो,

इब्री लोकांस 6:10

कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.

1 पेत्र 1:21

ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.

1 योहान 3:14

आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातूनजीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो.

1 योहान 3:23

तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्हीविश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे.

1 योहान 4:16

आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवरआम्ही विश्वास ठेवतो की, जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे. आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणिदेव त्या व्यक्तीमध्ये राहतो

3 योहान 1:3

जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तूसातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मलाफार आनंद झाला.

Interlinear

Choose Theme