आमोस 2:3 · मराठी बायबल
अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
Cross references
गणना 24:17
“मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
स्तोत्रसंहिता 2:10
म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
यशया 40:23
तो अधिपतींना निरूपयोगी करतो आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
यिर्मया 48:7
तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल.
यिर्मया 48:25
मवाबची शक्ती तोडण्यात आली आहे. मवाबचे हात मोडले आहेत.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.