Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 9:37 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 9:37 · मराठी बायबल

जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. त्यांनी (लोकांनी) तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले.

Cross references

मार्क 14:15

आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपांसाठी तयारी करा.”

योहान 11:3

त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.

योहान 11:36

तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”

प्रेषितांचीं कृत्यें 1:13

प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोटम्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).

प्रेषितांचीं कृत्यें 9:39

पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.

प्रेषितांचीं कृत्यें 20:8

वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.

Interlinear

Choose Theme